मी एक अद्भुत सृष्टी निर्माण केली आहे, पण यातील अनेक अद्भुत गोष्टी आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशात खरोखर अस्तित्वात आहेत…
या पुस्तकात अनेक रहस्यमयी गोष्टी असल्या, तरीही कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. यातील जादू फक्त मनोरंजनासाठी आहे. मनुष्य आपली बुद्धिमत्ता, परिश्रम आणि चिकाटीने विश्वातील मोठमोठ्या अगम्य रहस्यांचा उलगडा करू शकतो, हेच सांगण्याचा पुनःपुन्हा प्रयत्न केलेला आहे.......